विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : श्रावण कोल्हे व सुनील तिडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगरात तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालगोपालांनी नंदीबैल सजावट करून सामाजिक संदेश देणाऱ्या फलकासह सहभाग घेतला. सहभागी बालगोपालांना प्रमुख अतिथींच्या हस्ते वॉटर बॉटल व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने तुकाराम तिडके, वेदप्रकाश कोल्हे, सुधीर शेंडे, राकेश माटेटवार, भास्कर ठाकरे, हिराजी धारणे, रजनीश कोल्हे, राधेलाल बिसेन, विनोद जेट्टीवार, रूपाली कोल्हे, गीता माटेटवार, कल्याणी धाईत, शालिनी धारणे, मेघा खंडारे, स्नेहा शेंडे, दिपाली मुनगंटीवार, विभा येरणे, वैशाली वलादी, वंदना बिसेन, पवन धाईत, नरेश गुमडेलवार, वैशाली पडिशालवार, संतोष खोब्रागडे, नितीन तर्वेकर, सचिन एमप्रेड्डीवार, अविनाश झीलपे, संतोष मसराम, प्रकाश झिंगरे, बंडू निंबोरकर, मोहन येरणे, कैलाश अंबादे, सुरेश वरगंटीवार, मंगेश कोतपल्लीवार, अनिल प्यारमवार, समीर सुरमवार, शंकर रणदिवे, विनोद पोरेड्डीवार, प्रमोद चिलवारवार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती. यशस्वीतेसाठी लक्ष्मीनगर वार्डातील नागरिकांनी सहकार्य केले.







