Home गडचिरोली मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची सुरेशजी मांडवगडे परिवाराला सांत्वना भेट

मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची सुरेशजी मांडवगडे परिवाराला सांत्वना भेट

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली (रामनगर) येथील सामाजिक नेते सुरेशजी मांडवगडे यांचे वडील व मूळगाव गणपूर (ता. चामोर्शी) येथील रहिवासी अर्जुनजी मांडवगडे यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. या दुःखद प्रसंगाची बातमी कळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गणपूर येथे मांडवगडे परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त करत सांत्वन केले.
नेते यांनी परिवाराच्या दुःखात सामील होत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना केली. यावेळी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, लोहार समाजाचे नेते तथा चंद्रपूर शहर भाजपा उपाध्यक्ष विजयजी पोहनकर, भाजपाचे नेते प्रकाशजी भोयर, सोनटक्के, कवडूजी येरमे, धर्मदास नैताम, डॉ. कामटकर, प्रकाश भोयर, सरपंच सुधाकर गद्दे, नारायण झांपलवार, जीवनदास भाऊ तसेच लोहार समाजाचे सामाजिक नेते व मांडवगडे परिवार तसेच गावातील नागरिक जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!