Home गडचिरोली कटेझरी येथे माँ. जिजाऊ वाचनालयाचे उद्घाटन

कटेझरी येथे माँ. जिजाऊ वाचनालयाचे उद्घाटन

190

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कटेझरी नं. १ येथे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजुभाऊ जिवानी होते. उद्घाटक म्हणून कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चातगावचे प्रा. वासुदेव तडसे तर प्रमुख अतिथी म्हणून चातगाव ग्रामपंचायतचे सरपंच गोपाल उईके, उपसरपंच भूमिका धुळसे, ग्रामपंचायत सदस्य बावणे, शिक्षक सहारे, व्यापारी संघटना चातगावचे कोत्तावार, कवडुजी धंदरे, गाव पुजारी गोपाळराव मडावी, दिवाकर धुळसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी व अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने कटेझरी नं. १ या गावात वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयात विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी या वाचनालयाचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास मान्यवर व गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

आजच्या स्पर्धेच्या काळात अभ्यासक्रमातील अभ्यास व इतर वाचन करणे आणि त्याकरिता विविध प्रकारची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणे आवश्यक आहेत. त्याकरिता गावात वाचनालय सुरू करण्याची संकल्पना ठेवण्यात आली. गावात वाचनालय सुरू झाल्यास मुलांना अभ्यासाचे वळण लागेल आणि ते वाममार्गाकडे वळणार नाहीत, असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कटेझरी गावात वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचे गावकरी व परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे संचालन सुमित धुळसे यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश उईके यांनी केले. या कार्यक्रमाला माॅ. जिजाऊ वाचनालयाचे अध्यक्ष प्रज्वल ईस्टाम, सचिव सुमित धुळसे, सदस्य अथर्व कत्रोजवार, आदित्य देशमुख, अमन उसेंडी, सुरज मडावी, कोषाध्यक्ष विवेक धंदरे, भूषण लक्षणे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!