Home गडचिरोली आज गडचिरोलीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव

आज गडचिरोलीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सकल हिंदू समाज जन्माष्टमी समिती गडचिरोलीच्या वतीने आज, 16 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे आयोजन देवकुळे पटांगण चंद्रपूर रोड गडचिरोली येथे सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले आहे.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वतीने प्रथम बक्षीस ५१,१०१ रुपये ठेवण्यात आले आहे. दुपारी 2 ते 5 या वेळात राममंदिर ते दहीहंडी धामपर्यंत बाळगोपाळांची दहीहंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:30 ते रात्री 10 वाजतापर्यंत दहीहंडी उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष तथा युवागर्जना फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल तिडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उत्सवात जास्तीत जास्त बाल गोपालांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाज जन्माष्टमी समिती गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!