विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथील चाणक्य मतिमंद निवासी विद्यालयातील मतिमंद मुलांना रक्षाबंधनच्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी खाऊ आणि वही पेन वाटप करून राख्या बांधल्या.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, शाळेचे अधीक्षक सुरेश नारनवरे, योगिता माहुरे, दिनेश भुसकाळे, श्रीनिवास रापट्टीवार, आदिवासी आघाडी जिल्हा सचिव सुनीता मडावी, पौर्णिमा मडावी, रहिमा सिद्दिकी, माया बसमवार, गीता मिश्रा, कमल अनमूलवार, शेवंता गोटा आदींची उपस्थिती होती.







