विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील चातगाव येथील कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रा. वासुदेव तडसे यांच्या मार्गदर्शनात आज, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून चातगाव येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून जनतेच्या रक्षणाची ओवाळणी मागितली.

पोलिस बांधव देशसेवा आणि जनतेच्या रक्षणाकरिता आपले गाव व कुटुंबापासून दूर राहून विविध ठिकाणी कर्तव्यावर राहत असतात. त्यामुळे त्यांना अशा सणासुदीच्या दिवशी एकटेपणाची जाणीव होऊ नये या हेतुने चातगाव येथील विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. यावेळी चातगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, गावकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.





