विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नगर परिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई प्रमोद पिपरे यांची भाजपा महिला आघाडी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष या पदावर नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण, महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ, माजी खासदार अशोकजी नेते, भाजपा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, ओबीसी नेते बाबुरावजी कोहळे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, न. प. गडचिरोलीचे माजी सभापती तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बोर्ड पुणेचे संचालक प्रमोदजी पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रकाशजी गेडाम, सदानंद कुथे, महिला आघाडी प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री गीताताई हिंगे यांना दिले आहे.
भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी योगिताताई प्रमोद पिपरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील महिला पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांचे चाहते, ओबीसी समाज व सर्व सामाजिक संघटनानी त्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे. माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी यापूर्वी महिला आघाडी प्रभारी व जिल्हा महामंत्री भाजपा या पदावर असताना अनेक भाजपा महिला, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे सर्व योगिताताई पिपरे यांच्या कार्याबद्दल समाधानी होते. यामुळेच त्यांची महिला मोर्चा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. याबदल योगिताताई प्रमोद पिपरे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.







