Home गडचिरोली राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांच्यासह मा. खा. डॉ. अशोकजी...

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांच्यासह मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची एमआयडीसी बांबू प्रकल्प प्रक्रियेला सदिच्छा भेट

98
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी आज, 4 ऑगस्ट रोजी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या गडचिरोलीस्थित कॉम्प्लेक्स परिसरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या आदिवासी बांबू प्रक्रिया प्रकल्पाला सदिच्छा भेट देत पाहणी केली.

जिल्ह्यातील बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प आदिवासी युवांमध्ये स्वावलंबन निर्माण करणारा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार आहे, असे मत पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी प्रामुख्याने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रिती हिवरकर, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी ताकसांडे तसेच पदाधिकारी आणि बांबू प्रकल्पाशी संबंधित अधिकारीवर्ग उपस्थित होता.

error: Content is protected !!