Home गडचिरोली लॉयन्स क्लबद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांनी केले रक्तदान

लॉयन्स क्लबद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांनी केले रक्तदान

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात रक्ताची गरज पाहता लॉयन्स क्लब गडचिरोलीद्वारा नेहमीच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. 2 ऑगस्टला कमल-केशव सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सामाजिक बांधिलकी जपत एकूण ३४ (पुरुष २९ व महिला ५) रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजूंची गरज भागवण्यात मदत केली.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी डॉ. किशोर ताराम व त्यांची चमू यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले. रक्ताची कमतरता भरून काढणे आणि गरजू लोकांना मदत करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. रक्तदात्यांचे स्वागत करून त्यांना प्रमाणपतत्राने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच लायन्स क्लबच्या वतीने नागरिकांचे, रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानण्यात आले.

यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष महेश बोरेवार, सचिव नितीन बट्टूवार, कोषाध्यक्ष संध्या चिलमवार, शेमदेव चापले, देवानंद कामडी, मदतभाई जीवनी, दीपक मोरे, सुनील देशमुख, प्रभु सादमवार, सतीश पवार, नितीन चंबूलवार, रमेश काळबांडे, घनश्याम परशुरामकर, पुरुषोत्तम वंजारी, सपना बोरेवार, सविता बट्टूवार आदी सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!