Home गडचिरोली ईरुपटोला येथील जिजामाता शाळेत वृक्षारोपण

ईरुपटोला येथील जिजामाता शाळेत वृक्षारोपण

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जिजामाता हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ईरूपटोला येथील शालेय प्रांगणात शनिवार, २ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अरुण नन्नावरे, सहाय्यक शिक्षक विजय वाठोरे यांच्यासह शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना यावेळी वृक्षाचे महत्व पटवून देण्यात आले.वृक्षारोपण केल्यानंतर वृक्ष संवर्धनासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

error: Content is protected !!