– 5 लाखांचा 50 किलो अंमली पदार्थ (गांजा) पोलिसांनी घेतला ताब्यात
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी 24जुलै 2025 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्रवमालेवाडा हद्दीमधील धनेगाव व कातलवाडा येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्त असे आहे की, 24 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली यांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, धनेगाव येथे राहणारा इसम कालीदास पांडुरंग मोहुर्ले याने त्याचे राहते घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्री करीता साठवून ठेवला आहे. अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. समाधान दौड हे पोलीस पथकासह धनेगाव येथे रवाना झाले. गोपनिय माहितीमध्ये नमूद संशयीत इसम कालीदास पांडुरंग मोहुर्ले, वय 40 वर्षे, रा. धनेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये दोन रेघट पांढया रंगाच्या चुंगळींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला.
सदर चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता, दोन रेघट पांढया रंगाच्या पिशवींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा 40.825 कि.ग्रॅ वजन असलेला एकुण 4,08,250/- (अक्षरी – चार लाख आठ हजार दोनशे पन्नास) रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळुन आला. आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता, आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घरामध्ये सदर अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचे कबूल केले.
यासोबतच सदर कारवाई दरम्यान पोलीस पथकास गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या नवीन माहितीनूसार, कातलवाडा येथील इसम नामे तारेश्वर भुपाल चांग, वय 34 वर्षे याने त्याचे वडील नामे भुपाल चांग यांचे राहते घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्री करीता साठवून ठेवला आहे. यावरुन पोलीस पथकाने भुपाल चांग यांचे राहते घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये एका शेंदरी रंगाच्या चुंगळींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला. सदर चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता, एका शेंदरी रंगाच्या पिशवींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा 9.678 कि.ग्रॅ वजन असलेला एकुण 96,780/- (अक्षरी – छान्नऊ हजार सातशे एैंशी) रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळून आला. आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता, आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या वडीलांच्या राहते घरामध्ये सदर अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचे कबूल केले.
यावरुन आरोपी कालीदास पांडुरंग मोहुर्ले, वय 40 वर्षे, रा. धनेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली व आरोपी तारेश्वर भुपाल चांग, वय 34 वर्षे, रा. कातलवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, पुराडा येथे आज दिनांक 25/07/2025 रोजी अप. क्र. 72/2025, कलम 8 (सी), 20 (बी), 20 (बी)(त्त्)(सी) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आलेला एकूण 50.5 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर दोन्ही आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि. आकाश नाईकवाडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. समाधान दौड, सपोनि. भगतसिंग दुलत, मपोउपनि. सरिता मरकाम, पोना/चौधरी, पोअं/गरफडे, गोंगले, मपोना/चव्हान, चापोअं/कोडापे, पोअं/दुधबडे, पंचफुलीवार, चापोअं/लोणारे व फोटोग्राफर देवेंद्र पिदुरकर यांनी पार पाडली.







