विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने गडचिरोलीतील कारगील चौक येथे भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम उद्या, २६ जुलै रोजी सकाळी ९:४० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम कारगील दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्यातर्फे मागील २५ वर्षांपासून सातत्याने साजरा करण्यात येतो. यंदाही कार्यक्रम २६ जुलै रोजी सकाळी ९:४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.
सदर कार्यक्रमाला गडचिरोलीतील सर्व देशभक्त नागरिक, युवक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले आहे.







