– आमदार डॉ. मिलींद नरोटे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शहरानजीकच्या इंदिरानगर येथे 13 जुलै रोजी मोहम्मद नौशाद कुरेशी, आयन कुरेशी, रेहान कुरेशी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गोमांस साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे पावसाळी अधिवेशनात असल्यामुळे घटनास्थळी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र 24 जुलै रोजी ते घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या गंभीर प्रकाराची पाहणी केली. संबंधितांवर केवळ तक्रार नव्हे, तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाला दिले.
याशिवाय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण त्वरित हटवण्याचे तसेच अतिक्रमित जमीन दोस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा बेकायदेशीर आणि समाजविघातक कृतींना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात शिथिलता खपवून घेतली जाणार नाही, असेही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी म्हणाले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, गणेशजी दहलकर, पवनजी ठाकरे, अंकुश पवार, रितेश केरामी, यश कोंडावार, अरुप हलदार, समीर तांबेकर सुमित पिपरे, तसेच बजरंग दल पदाधिकारी, वन विभाग, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.







