– राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली चक नंबर एक व मक्केपल्ली माल येथील 18 शेतकरी, शेतमजूर शेत शिवारात धान रोवणीसाठी 23 जुलैला शिमूलतला गेले होते. त्यापैकी 16 शेतकरी धानाचे पेंडया काढण्यासाठी शेत शिवारात होते व दोघेजण वयस्कर असल्यामुळे झाडाखाली बसून होते व याच ठिकाणी वीज पडली आणि काशिनाथ कारुजी वैरागडे (वय 55) मक्केपल्ली चक नंबर एक, जखमी झाले व त्यामधील शेतकरी महिला चंद्रकलाबाई अशोक पातर (वय ४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृतक महिला व जखमी शेतकरी शेतमजूर यांना राज्य शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, प्रवक्ता ग्यानेंद विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर, विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, बाळूभाऊ मामीडवार, चामोर्शी तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, कुरखेडा तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी केली आहे,







