Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

57
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री योगीताताई प्रमोदराव पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, 8 जुलै 2025 रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या सकाळी 10 वाजता “एक पेड मॉ के नाम” वृक्षारोपन कार्यक्रम गो. ना. मुनघाटे शाळेसमोरील ओपन स्पेसमध्ये (गार्डन) पंचवटीनगर सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता ‘माणुसकीचा घास’ अन्नदान कार्यक्रम महिला रूग्णालय गडचिरोली येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता अभिष्टचिंतन सोहळा शासकिय विश्रामगृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व कार्यक्रमांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा लोकसभा समन्वयक तथा गडचिरोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक इंजि. प्रमोदराव पिपरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!