Home गडचिरोली विसापुरातील जमिनीचा वापर सार्वजनिक हितासाठी करावा

विसापुरातील जमिनीचा वापर सार्वजनिक हितासाठी करावा

203

– केशव निंबोड व नागरिकांची नगर परिषद प्रशासनाकडे मागणी

– आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनाही निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील विसापूर येथील भूमापन क्रमांक व उपविभाग 333 मधील आराजी 1.21 हे. आर. या सार्वजनिक जमिनीचा वापर सार्वजनिक हितासाठी व्हावा याबाबत गडचिरोली नगर परिषद प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी विसापूर येथील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात माजी नगरसेवक केशव निंबोड यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पशुपालकांच्या सार्वजनिक वापरत राहिलेल्या जागेचा फेरफार एका खासगी व्यक्तीच्या नावाने करून महसूल विभागाने एक वेगळाच कारनामा केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी सदर जागेचा वापर स्मशानभूमी म्हणून होत होता. सद्य:स्थितीत त्या जागेचा वापर गुरे बसविण्यासाठी (आकरासाठी) होत आहे. त्यामुळे एका खासगी व्यक्तीला मंजुरी दिलेला आदेश रद्द करण्यात यावा, अशीही मागणी माजी नगरसेवक केशव निंबोड व विसापुरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

error: Content is protected !!