Home गडचिरोली घोड्यावर बसवून नवागतांचे स्वागत

घोड्यावर बसवून नवागतांचे स्वागत

196

– इंग्रजी आश्रमशाळेत प्रवेशोत्सव ; पाठ्यपुस्तकांचे वितरण

– वृक्षारोपणात मान्यवरांसोबत विद्यार्थ्यांचा सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत शुक्रवार, २७ जून रोजी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांनी वृक्षारोपण केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. घोड्यावर बसवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम, उपाध्यक्ष रोशन कुमरे, डॉ. गीतांजली सिडाम, डॉ. श्रावंती कल्हुरी, अनिल सुरपाम, गिरीधर कोवे, वेणूताई धुर्वे, मेघा मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रवेश दिंडीने झाली.सेल्फी पॉइन्टमध्ये नवागत विद्यार्थ्यांसोबत फोटो काढण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकला प्रदर्शनी भरविण्यात आली. अभिव्यक्ती व भविष्यवेधी उपक्रमांची माहिती देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. पालकांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले. सुरुची सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केले. संचालन निलेश कळंब व शारदा कोटांगले तर आभार प्रदर्शन अतुल बलगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक गुलाब डोंगरवार, डाकराम धोंगडे, रामदास पिल्लारे, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!