Home गडचिरोली खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन वितरण

खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन वितरण

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) पक्षाच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जून २०२५ रोजी गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णयातील परिसरात रुग्णांच्या नातेवाहिकांना ‘माणुसकीचा घास’ या स्तुत्य उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) जि. गडचिरोलीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनात अन्न वितरित करण्यात आले.

यावेळी गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार,
जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, महिला जिल्हाध्यक्ष मिनल चिमुरकर, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष वृषभ गोरडवार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शाहरुख शेख, भास्कर निमजे, सुनिल चिमुरकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षा निता बोबाटे, बेबी लभाणे व माणुसकीचा घास या कार्यक्रमाचे संयोजक संजय मेश्राम यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!