Home गडचिरोली भाग्यश्रीताई आत्राम यांच्या ठिय्या आंदोलनाला जनकल्याण समाजोन्नती समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार...

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या ठिय्या आंदोलनाला जनकल्याण समाजोन्नती समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांची भेट

98

– विविध विषयांवर केली भाग्यश्रीताई आत्राम यांच्याशी चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ढोंगी महायुती सरकारला धारेवर घेत वीर बाबुराव शेडमाके चौक आलापल्ली येथे विविध मागण्यांना घेऊन सोमवारपासून सुरू झालेल्या विशाल अशा ठिय्या आंदोलनाला जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोषजी ताटीकोंडावार यांनी भेट देऊन विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस भाग्यश्रीताई आत्राम यांच्याशी चर्चा केली.

यावेळी शरद पवार गटाच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, कार्याध्यक्ष प्रकाशजी ताकसांडे, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, जहीर हकीम, रहमान शेख, सुमित मोतकूरवार, जितेंद्र टिकले, अभी नागूलवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!