– युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त, अल्पभूधारक शेतकरी कुटूंबाला शेती मशागतीसाठी आर्थिक मदत व बियाणे-खत वाटप
– शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी घेतला पुढाकार
– पिकाच्या पेरणीपासून मळणीपर्यंतच्या मशागतीची स्विकारली जबाबदारी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शेती आणि शेतकरी म्हटला की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतू आज देशाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्पभुधारक शेतकऱ्यांना नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागत आहे. गोरगरीब शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरूष निघून गेल्यानंतर कुटुंबावर दु:खाचे केवढे डोंगर कोसळते याची कल्पनाच न केलेली बरी. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार देणे ही शासन व समाजाची तेवढीच जबाबदारी आहे. निराधार कुटुंबांच्या मदतीला धावून जाणे व मदत करणे हा मोठा मानवधर्म आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या सेवाकार्याची परंपरा कायम ठेवीत कारवाफा, मुडझा, कुरखेडा (सावरगाव) आणि राजोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहाय्य आणि खरीप हंगामासाठी बियाणे-खते वितरित करून युवासेनेचे अध्यक्ष मा. आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करीत शेतकरी कुंटूंबाला आधार दिला. एवढेच नव्हे तर नापिकीमुळे मृत्यूला कवटाळलेल्या चार शेतकरी कुटुंबाचा पेरणीपासून मळणी पर्यंत शेती मशागतीचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारून आदर्श निर्माण केला आहे.
हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निर्माण केलेला सामाजिक कार्याचा वसा आजही मा. उध्दवसाहेब ठाकरे व मा. आदित्यसाहेब ठाकरे जोपासत आहेत. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणानुसार मा. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याकडून समाजसेवेचे कार्य अखंड सुरू आहे. युवासेना प्रमुख मा. आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज १३ जून रोजी सेवाभावाने साजरा करण्यात आला.
गडचिरोली तालुक्यातील राजुली येथील पितांबर फुलझेले, कुरखेडा (चातगाव) येथील रघुनाथ तुमराम, मुडझा येथील बंडू चौधरी व धानोरा तालुक्यातील कारवाफा येथील गिरिधर बावणे या अल्प भूधारक शेतकऱ्यांनी गळफांस लावून आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. शेतीकरीता लागणार खर्च जुळवाजुळव करणे कठीण झाले, प्रसंगाचे गांभिर्य ओळखून दरवर्षी प्रमाणे यंदाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक मदत देऊन कुटुंबाला आधार देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, स्वप्नील जुमनाके, यादव चौधरी, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, कुमदेव आवारी, दुर्योधन भैसारे, राजेंद्र ढवळे, साहिल कारेते, मुदीन चौधरी, शामसुंदर कावळे, अमित हुलके, गिरीधर टेकाम, प्रकाश भजभुजे, निकेश कोलते, मयुर मेश्राम, लंकेश सयाम, प्रमोद ठाकरे, रमेश मेश्राम, श्रावण मंगर, सुरेश मानकर, होमराज भैसारे, युवराज सहारे शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.







