Home गडचिरोली राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने  राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा निवड चाचणी रविवार, ८ जून रोजी येथील सी.आर.पी.एफ. कॅम्प जवळील एम. आय. डी. सी. च्या मैदानावर पार पडली.

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा २१ ते २३ जून दरम्यान पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे येथे आयोजित केल्या जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता गडचिरोली जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली.

या निवड चाचणी स्पर्धेत पुरूष गटात १०० व २०० मीटर धावणे स्पर्धेत शादाब बेग, अभिनव नैताम, ४०० मीटर स्पर्धेत निशांत भुकया, कासिफ शेख, ८०० मीटर संदीप उसेंडी, १५०० मीटर अविनाश कांडो, अतुल पुसावी, ५००० मीटर यश बांदेकर, रोशन बोदलकर, १०,००० मीटर यश बांदेकर, अविनाश कांडो, लांबउडी स्पर्धेत अभिनव नैताम तर ४*१०० रीले स्पर्धे करिता अभिनव नैताम, दिनेश मडावी,अतुल पुसावी, देवित तलांडे, निशांत भुकया, तर ४*४०० मीटर रिले स्पर्धे करिता अविनाश कांडो,यश बांदेकर, पीयूष सोनुले, ओमकार दरो यांची निवड करण्यात आली.

महिला गटात १०० मीटर धावणे स्पर्धेत मोनिका मडावी,२०० मीटर श्रेया शेबे,४०० मीटर जयश्री करंगामी, नूतन चौके, ८०० मीटर वैष्णवी दते, नूतन चौके, उंचउडी मोनिका मडावी, गोळाफेक श्रेया शेब तर ४*१०० मीटर रिले स्पर्धे करिता श्रेया शेबे, नूतन चौके, अमृता होळी, शितल गेडाम यांची निवड करण्यात आली.

गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आशिष नंदनवार यांच्या मार्गदर्शनात निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला पंच म्हणून महेश वाढई , राहुल जुआरे, महेंद्र मने, अमोल बांगरे व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!