Home गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा

331

– निरीक्षक अतुल वांदिले यांचे प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे मागील पाच दशकांहून अधिक काळापासून या देशातील दलीत शोषीत, पीडित, वंचितांकरिता काम केले असून, त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि पुढे होणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस तथा गडचिरोली जिल्हा निरीक्षक अतुल वांदिले यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक नुकतीच गडचिरोली शहरातील चामोर्शी रोडवरील फंक्शन हॉलमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली १८ मे ३०२५ रोजी दुपारी पार पडली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी निरीक्षक राजेंद्र वैद्य, राज्य सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, राज्य चिटणीस ॲड. संजय ठाकरे, राज्य चिटणीस ओम शर्मा, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, कृउबास चामोर्शी उपसभापती परमानंद मल्लिक, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चिंतलवार, एनटी जिल्हाध्यक्ष सचिन चलकलवार, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष रतन मलिक, युवक जिल्हाध्यक्ष हिमांशु देशमुख, युवक प्रदेश सचिव करण गण्यारपवार, प्रदेश उपाध्यक्ष विद्यार्थी ऋषभ गोरडवार, कोरची तालुकाध्यक्ष प्रताप गजभिये, महिला जिल्हा उपाध्यक्ष मीनल चिमुरकर, जिल्हा सचिव ऋतुजा कन्नाके, विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, जिल्हा जिल्हा को–आप बँक संचालक अमोल गण्यारपवार, वडसा तालुका अध्यक्ष क्षितिज उके, गडचिरोली तालुका अध्यक्ष मनोहर भोयर, चामोर्शी तालुकाध्यक्ष कबीर आभारे, मुलचेरा तालुकाध्यक्ष अशोक आडके, अहेरी तालुकाध्यक्ष रमेश चुक्कावार, जिल्हा उपाध्यक्ष सत्यनारायण गुप्ता, सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार म्हणाले की, आपल्या पक्षाची भूमिका ही विकासाभिमुख असून, दिवंगत आर. आर. पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांकरिता कोट्यवधी रुपयाचा निधी आणून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला, जेष्ठ नागरिकांच्या विकासाकरिता काम केला. मात्र जिल्ह्यात त्यांच्यानंतर विकास थांबलेला आहे, असे सांगितले.

यानंतर राजेंद्र वैद्य, सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण विजय गोरडवार यांनी केले. संचालन शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष मुरलीधर नागोसे यांनी तर आभार प्रदर्शन किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे यांनी केले.

यावेळी भास्कर निमजे, सुनील कत्रोजवार, नईमा हुसेन, विमल भोयर, सुरेश नैताम, नीलेश कोटगले, गुलाब धोती, गुलाब मोडले, सुधाकर निखाडे, गोसावी सातपुते, शामराव पोरटे, मोरेश्वर चलकलवार, पंचरंग मंडल, रामनाथ कोरचा, विजया बोगा, राहुल पुसतोडे, मुरलीधर बुरे, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जि. प. सदस्य, तथा जिल्हा कार्यकारीनी सदस्य व बाजार समिती संचालक, खरेदी-विक्री संचालक, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!