Home गडचिरोली शेतकऱ्याच्या शेतजमिनी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

शेतकऱ्याच्या शेतजमिनी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

61
Oplus_16908288

– काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांचा पत्रपरिषदेत आरोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याचे स्वप्न दाखवून गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतजमिनी अगदी मुबलक व अल्प दरात उद्योगपतीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान, आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जि. प. सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव ॲड. विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!