Home गडचिरोली मुलेटीपदिकसा येथे आ. रामदास मसराम यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न

मुलेटीपदिकसा येथे आ. रामदास मसराम यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न

82
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरची तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले मुलेटीपदिकसा येथे सत्कार समारंभाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर गावातील जेष्ठ नागरिक, वृद्ध महिला व पुरुष यांचाही आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जुनी आणि जीर्ण झाल्यामुळे आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यासोबतच गावात जाणाऱ्या व अंतर्गत रस्त्यांची पाहणी करण्यात आली. गावकऱ्यांनी आमदार साहेबाना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये शाळा इमारतीचा नवा प्रस्ताव, रस्ते डांबरीकरण, वीज व पाण्याच्या समस्या यांचा समावेश होता.

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी गावकऱ्यांना सांगितले, तुमच्या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चितच योग्य त्या पद्धतीने काम करून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!