– आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी (बाजीराव टोला) येथे ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार नवीन सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन २ मे २०२५ रोजी संपन्न झाले. या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, ग्रामस्थांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी एक सुसज्ज व उपयोगी मंच उपलब्ध होणार आहे. यामुळे गावातील नागरिकांना विवाह समारंभ, कार्यक्रम, सभा व विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी स्थायी जागा मिळणार आहे. तसेच गावकऱ्यांच्या वतीने शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास काँग्रेस कमिटी आरमोरीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शिगुजी ताडाम, चंद्रशेखर टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली मडावी, शामरावजी अलाम, जीवन वाल्को, देव कोर्चा, जाणिक दर्रो, रमेश नैताम, सुरेश दर्रो, हगरू मडावी, यशवंत जनबंधू, सुधाकर कोल्हे, राजू दर्रो, वासुदेव मडावी, हिरामण बोगा, मणिबाई मडावी, जास्वंदा होळी, आशाताई बोगा यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार रामदास मसराम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून, गरजेनुसार रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि सार्वजनिक सोयीसुविधांसाठी निधी मिळवून देण्याचे कार्य सातत्याने सुरू राहील.







