विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे ६६ वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण प्रभारी मुख्याध्यापक सुधीर शेंडे यांच्या हस्ते झाले. ध्वज संचालन माध्यमिक शिक्षक व्ही. एस. देसू यांनी केले.मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली.
यावेळी उच्च माध्यमिक शिक्षक टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, माध्यमिक शिक्षिका वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, संगीता पुराम, योगेश उसेंडी, स्वप्निल राठोड, करिश्मा गोवर्धन, सुनिता देवावार, संगीता करंगामी व कर्मचारी उपस्थित होते.







