Home गडचिरोली आभा संग्रामेची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

आभा संग्रामेची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

91
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक वियाणी विद्यानिकेतन शाळेची खेळाडू आभा ओमप्रकाश संग्रामे हिची 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्य स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. 14 वर्षाखालील 68 वी राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्य स्पर्धा क्रीडा व युवक कल्याण विभाग महाराष्ट्र, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 13 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या स्पर्धेत सहभागी खेळाडूंची प्रशिक्षण शिबिर विभागीय क्रीडा संकुल सारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे 12 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. त्यात आभा ओमप्रकाश संग्रामे सहभागी झालेली आहे.

आभा संग्रामे हिने आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे महासचिव डॉ. प्रदीप तळवेकर, डॉ. सुरज येवतीकर, पियुष आंबुलकर, डॉ. दर्शना येवतीकर, राष्ट्रीय प्रशिक्षक किशोर चौधरी, सॉफ्टबाल संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, मुख्य प्रशिक्षक तथा सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, प्राध्यापिका रुपाली पापडकर यांना दिले आहे.

error: Content is protected !!