Home गडचिरोली टँकर चोरीला ; पाच दिवसानंतरही शोध नाही

टँकर चोरीला ; पाच दिवसानंतरही शोध नाही

86
Oplus_131072

– पोलिसांची शोध मोहीम सुरूच

– टँकर शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील शासकीय वसाहतीमधून पाण्याचा टँकर चोरीला गेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही शोध लागला नाही. पोलिसांची शोध मोहीम सुरूच असून टँकर सापडला नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.

येथील भाजपा शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मुक्तेश्वर काटवे यांना गडचिरोली गडचिरोली शहरातील परिसरातील रस्ते व नाली बांधकामाचे कंत्राट मिळाले आहेत. सदर बांधकामाला दिवसभर पाणी दिल्यानंतर टँकर त्याच ठिकाणी ठेवला होता. दरम्यान, सोमवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास सदर टँकर चोरीला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी टँकर आणण्यासाठी गेले असता टँकर गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोधाशोध केली असता टँकर दिसून आला नाही. याबाबत गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरीचे दृश्य कैद झाले आहे.

गडचिरोली पोलिस सदर टँकरचा शोध घेत आहेत. मात्र पाच दिवसानंतरही त्या टँकरचा शोध लागला नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे झाले आहे. सदर टँकरचा शोध मुक्तेश्वर काटवे व परिवारातील सदस्य सुध्दा घेत आहेत. या घटनेमुळे काटवे यांची चिंता वाढली आहे.

अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने अशा चोरांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!