विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे बाल गणेश मित्र मंडळ कळमटोला यांच्या सौजन्याने ‘निजला का राजहंस माझा’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन कळमटोला येथे बाल गणेश मित्र मंडळ कळमटोला यांच्या सौजन्याने ‘निजला का राजहंस माझा’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, देवेंद्र जांभूळकर, छत्रपती ठाकरे, अरविंद जांभुळकर, मुखरू मुंडरे, रेवनाथ उंदीरवाडे, रानू ठाकरे, बापू सहारे, वामन ठाकरे, ज्ञानदेव ठाकरे, विलास नन्नावरे, सुधाकर भोयर, दिलीप कोडाप, नारायण ढोणे, वसंत भोयर, मनोज वट्टी, पंढरी ठाकरे, जीवन मुरतेली, छत्रपती करकाडे, सोमाजी कावळे, प्रणित सहारे, कृष्णा करकाडे, सुरेश उंदीरवाडे, साईनाथ उईके, राजेंद्र उंदीरवाडे आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







