विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथील राष्ट्रिय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यालय व भारत इन्साईट न्युज रूम येथे संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करुन व संविधान वाचन करून आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने राष्ट्रिय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, राष्ट्रिय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, ग्रामसेवक आसुटकर, शिक्षक जगदीश मडावी, व्यवस्थापक रुपेश पाटील पिपरे व मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना डॉ. प्रणय खुणे यानी मार्गदर्शन केले व सांगितले जनसामान्यांच्या प्रत्येक घरात संविधान असायला पाहिजे.







