Home गडचिरोली आज तकच्या न्यूज अँकर अंजना ओम कश्यप ८ नोव्हेंबरला गडचिरोलीत

आज तकच्या न्यूज अँकर अंजना ओम कश्यप ८ नोव्हेंबरला गडचिरोलीत

90

– राजतिलक कार्यक्रम ; निवडणुकीसंदर्भात जनतेशी करणार चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज तक न्यूज चॅनलच्या प्रसिद्ध न्यूज अँकर अंजना ओम कश्यप शुक्रवार, ८ नोव्हेंबरला राजतिलक कार्यक्रमासाठी गडचिरोलीत येत आहेत. त्यांच्या समवेत अधीर रंजन चौधरी हे सुद्धा येणार असल्याची माहिती आज तक न्यूज चॅनलचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार यांनी दिली आहे.

अंजना ओम कश्यप ह्या हेलिकॉप्टरने ११.३० वाजता गडचिरोलीत दाखल होणार आहेत. आज तक न्यूज चॅनलच्या वतीने राजतिलक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आयटीआय स्क्वेअर सावरिया हनुमान चौक कॉम्प्लेक्स, आयटीआय चौक, त्रिमूर्ती चौक, गडचिरोली (मार्केट लाईन), बस स्टॉप तहसील कार्यालय समोर येथे येणाऱ्या गडचिरोली विधानसभा निवडणूकसंदर्भात जनतेच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

error: Content is protected !!