– आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्धाटन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांना पुन्हा पक्षाचा आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे 2019 प्रमाणेच आपल्याला प्रचार कार्यक्रमाला जोमात लागुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयन्त करायचा आहे. आमदार कृष्णा गजबे यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असा निर्धारच कार्यकर्त्यांनी करावा, असे प्रतिपादन सहकार नेते तथा सहकार विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले.
आरमोरी येथील भाजपा -शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाई- पिरिपा महायुतीचे उमेदवार आमदार कृष्णा दामाजी गजबे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केले. प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनावेळी लोकसभा समन्वयक किसनजी नागदेवे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते युनूस शेख, शिवसेना शिंदे गटाचे नारायणजी धकाते, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोती कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते भरत जोशी, माजी नगसेवक रामकृष्णजी मैंद, माजी महिला व बालकल्याण सभापती जि. प. रोशनी पारधी, माजी नगराध्यक्षा शालू दंडवते, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलिधरजी सोंदरकर, संतोष गोंधळे, माजी सभापती पं. स. मोहन गायकवाड, तालुका महामंत्री भाजपा वसंता दोनाडकर, योगेश नागतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते संजय साळवे, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, माजी नगरसेवक दीपक झरकर, नरेश विठ्ठलानी, संचालक कृ. उ. बा. स. हिरु शेंडे, भरतजी जोशी, तालुका उपाध्यक्ष भाजपा शंकर पारधी आणि इतर मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी केले.







