– शंकरपुर येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यापासून 10 किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर येथे 5 नोव्हेंबरला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व रिबीन कापून करण्यात आले.
व्हॉलीबॉल खेळ हा राज्यातच नाही तर देशात खेळला जात आहे. व्हॉलीबॉल खेळातून खेळाडूंनी स्वतःचे नावलौकिक करून खेळाडूंनी खेळ खेळताना आपले ध्येय निच्छित करून आवडत्या खेळात उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन शंकरपुर येथे उद्घाटनप्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांनी केले. यावेळी शंकरपुर येथील स्थानिक पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते .







