विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कोणत्याही सामानाची गरज नसलेला खेळ म्हणजे कबड्डी आहे. चार हजार वर्ष पासून कबड्डी खेळ खेळला जात आहे. या खेळाचा उल्लेख महाभारतात पण आहे. हा खेळ खेळण्यासाठी ताकत आणि समजदारी आवश्यक आहे तेवढीच अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते. या खेळाचा आंतरराष्ट्रीय खेळात समावेश आहे. त्यामुळे अधिक लोकप्रिय खेळ आहे. स्फूर्ती आणि सक्तीचा खेळ आहे. शाररिक, मानसिक, नैतिक विकासासाठी खेळ महत्वाचे असून राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी मदत होते. त्यातून लोकांचा मनोरंजन सुद्धा होत असतो.खेळामुळे युवकांचे ऋणानुबंध दृढ होतात, असे प्रतिपादन देलणवाडी येथे कबड्डी स्पर्धेच्या उद्धाटक स्थानावरून आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
जय बजरंग बली नाट्य व क्रीडा मंडळ देलणवाडीच्या वतीने कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक आमदार कृष्णा गजबे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपारिक्षेत्र अधिकारी मेहर हे होते. सहउद्घाटक जिल्हामहामंत्री सदानंद कुथे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, माजी जि. प. सदस्य संपत आडे, दिलीप कुमरे हे होते. प्रमुख अतिथी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय हेमके, दुमेश राऊत, रत्नाकर धाईत सावकार, प्रदिप बोडणे, सरपंच प्रियंका कुमरे, नंदू पेट्टेवार, राहुल धाईत सावकार, पो. पा. कोमल धुर्वे, ग्रा. प सदस्य किरण मस्के, ग्रामसेवक आखाडे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव मुरकुटे यांनी केले. संचालन धनंजय आलम यांनी केले. आभार मनीष घोडमोरे यांनी मानले. दीपावलीच्या शुभपर्वावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन हा मंडळ करीत आहे.







