विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती, भाजपाचे जेष्ठ नेते, ओबीसी नेते स्वर्गीय रमाकांतजी ठेंगरे (गुरुजी) यांचे 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्रौ 11.30 ला अल्पशा आजाराने ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात उपचार घेत असताना निधन झाले.
या संबंधित आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर मोहटोला येथील निवासस्थानी जाऊन अंतीम दर्शन घेत गाढवी नदीघाट मोहटोला येथील अंत्यविधीला उपस्थित राहून शोकसभा निमित्ताने त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मौन पाडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत ठेंगरे परिवाराला दुःख सावरण्याचं बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आमदार गजबे यांनी शोकसभेला संबोधित करताना म्हणाले की, रमाकांत भाऊंनी समाजसेवकाप्रमाणे अनेक गरजूंना जवळपास 105 वेळा रक्तदान केले असून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे समाजाला समजावून सांगितले. वेळोवेळी अनेकांच्या मदतीला धावून गेले. अनेक दिनदुबळ्यांनाचे आधारस्तंभ बनून राहिले. भाजपा संघटन वाढविण्यामध्ये रमाकांत भाऊचा मौलाचा वाटा असून, आपल्या भाजपा संघटनेचे तसेच ओबीसी समाजातील एक प्रखर नेतृत्व एक मोठा नेता हिरावला असून ही पोकळी कधी न भरून येणारी आहे.
स्व. रमाकांतजी ठेंगरे (गुरुजी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आ. गजबे केली.
याप्रसंगी शोकसभेला उपस्थित गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ जेठानी, तालुकाध्यक्ष सुनिलजी पारधी, तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, रविभाऊ गोटेफोडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, संजयजी बारापात्रे, राऊत सर, ओबीसी नेते हितेंद्रजी धोटे, नाटय कलावंत दिवाकरजी बारसागडे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.







