Home गडचिरोली घारगाव येथे दिवाळीनिमित्त दंडारीचे आयोजन

घारगाव येथे दिवाळीनिमित्त दंडारीचे आयोजन

87
Oplus_131072

– आमदार डॉ. देवराव होळी व जयश्रीताई वेळदा – जराते यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील जय वाल्मिकी दंडार मंडळ घारगावतर्फे दिवाळीनिमित्त शुक्रवारी रात्री दंडारीचे आयोजन करण्यात आले होते. या दंडारीचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे आमदार व सध्याचे अपक्ष उमेदवार डॉ. देवराव होळी व शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा भोई ढिवर व तत्सम जमाती संघटनेचे जिल्हा सचिव किशोर बावणे, सहअध्यक्ष भाई रामदास जराते तर प्रमुख अतिथी म्हणून भाई शामसुंदर उराडे, भाजपचे दिलीप चलाख, घारगावचे उपसरपंच कबीर आभारे, मारोती आगरे व गावातील प्रतिष्ठित प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!