Home गडचिरोली डॉ. सतिश वारजुकर यांच्या नामांकन अर्ज दाखल सभेला ना. विजय वडेट्टीवार व...

डॉ. सतिश वारजुकर यांच्या नामांकन अर्ज दाखल सभेला ना. विजय वडेट्टीवार व खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती 

126
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : चिमूर (जि. चंद्रपूर) येथे काँग्रेस माहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सतिश वारजुकर यांचे नामांकन अर्ज दाखल सभेला प्रामुख्याने गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून सभेला मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजुरकर, विधानसभा उमेदवार डॉ.सतीशभाऊ वारजूरकर, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती प्रफुल खापर्डे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर डॉ.विजय पाटील गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे, काँग्रेस नेते विनोद बोरकर, गजानन बुटके, प्रा.राम राऊत, अनमोल शेंडे, अनिरुद्ध वनकर, पुरुषोत्तम बगमारे, साईस वारजुरकर, प्रमोद चौधरी, अगडे, रोशन ढोक, प्रतीक भसीम, पवन बंडें, गोविंदराव तळवेकर, गोपाल झाडे, आरिफ भाई शेख, शुभम पारधी, पप्पू कादिर शेख, राजेश चौधरी, सौ.अनीता वारजुरकर, सौ. प्रणया गड्डमवार, सौ.सिमा बुटके, सौ. गीतांजली तुटे, सौ. माधुरी रेवतकर, सौ.भावना बावनकर, सौ.लता पिसे, पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने चिमुर विधानसभा क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होते.

error: Content is protected !!