Home गडचिरोली प्राचार्य अनिल आक्केवार यांचा सेवानिवृतीनिमित्त सत्कार

प्राचार्य अनिल आक्केवार यांचा सेवानिवृतीनिमित्त सत्कार

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथून प्राचार्य पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले अनिल आक्केवार यांचा सेवानिवृतीपर सत्कार समारंभ त्यांच्या भूगोल मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. कुबडे (आलापल्ली) तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र झाडे उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य अनिल आक्केवार व त्यांच्या सहचारिणी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वासुदेव तडसे यांनी केले. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय, संयमी, मृदुभाषी, प्रेमळ, नेहमी दुसऱ्यांना मदत करणारे अशी प्रा. अनिल आक्केवार यांची ओळख असल्याचे प्रतिपादन प्रा. वासुदेव तडसे यांनी याप्रसंगी केले.

या सेवानिवृत्ती सोहळ्याला प्रा. निमगडे (भामरागड), माजी मुख्याध्यापक तंगडपल्लीवार (आष्टी), मुखाध्यापक पानघाटे (चंद्रपूर), प्रा. खाडे (चामोर्शी), गेडाम सर व मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!