विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त देसाईगंज येथील भाजपा महिला मोर्चाच्या महिला भगिनींनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना राखी बांधून औक्षण केले. यावेळी मंचावरील इतरही प्रमुख पाहुण्यांना राखी बांधून औक्षण करण्यात आले.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्यासह लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी जेठानी, भाजपा (ग्रामीण) तालुकाध्यक्ष सुनीलजी पारधी, भाजपा शहराध्यक्ष सचिनजी खरकाटे, तालुका महामंत्री योगेशजी नाकतोडे, तालुका महामंत्री वसंताजी दोनाडकर, आरमोरी कृ. उ. बा. समितीचे संचालक हिरालालजी शेंडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष शंकरजी पारधी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






