Home गडचिरोली आरोग्यावर खर्च कमी करायचा असेल तर आहारात रानभाज्याचा उपयोग करा : आमदार...

आरोग्यावर खर्च कमी करायचा असेल तर आहारात रानभाज्याचा उपयोग करा : आमदार कृष्णा गजबे

76

– कुरखेडा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानवी आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून मानवांनी आरोग्यावर खर्च कमी करायचा असेल तर सर्वांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा उपयोग करावे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते २३ ऑगस्ट २०२४ रोजी तालुका कृषी कार्यालय कुरखेडा यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, अध्यक्ष म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे तर प्रमुख अतिथी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, सर्वंग विकास अधिकारी धीरज पाटील, तालुका व्यवस्थापक उमेद सरोज मारेकरी, नगराध्यक्ष अनिता बोरकर, उपाध्यक्ष बबलू हुसैनी, अध्यक्ष शेतकरी तालुका समन्वय चांगदेव फाये, सामाजिक कार्यकर्ते गणपतराव सोनकुसरे, नगरसेवक अँड. उमेश वालदे, नगरसेवक अशोक कंगाली, बोके मॅडम, ना. तहसीलदार मानकर, कवियत्री संगिता ठलाल, मरसकोल्हे उपस्थित होते.

यावेळी कुरखेडा तालुक्यातील विविध बचत गटातील महिलांनी रानभाज्याचा स्टॉल लावून रान भाज्याची महती पटवून दिली. यावेळी कुषी विभागा मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!