– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन
– ११ ऑगस्टला किसान भवन धानोरा येथे भाजपा तालुका व शहर कार्यकारणी बैठकीचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी तालुका धानोरा व शहर कार्यकारणीची बैठक ११ ऑगस्ट २०२४ रोजी धानोरा येथील किसान भवन धानोरा येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही तालुका व शहर कार्यकारिणीची विस्तृत बैठक असून संपूर्ण दिवस चालणार आहे.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.







