Home गडचिरोली सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची चर्चा गावागावात करा : आमदार डॉ. देवराव होळी

सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची चर्चा गावागावात करा : आमदार डॉ. देवराव होळी

71
Oplus_0

– चामोर्शी येथे तालुका कार्यकारणी बैठकीचे आयोजन

– जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचा वाढदिवस बैठकस्थळी केक कापून केला साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्या योजनांची गावागावात चर्चा करून जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास व महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा जनतेला सांगितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय नक्कीच होईल, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथे आयोजित तालुका कार्यकारणीच्या बैठकीप्रसंगी केले.

चामोर्शी तालुका कार्यकारिणीची बैठक सावतेली समाज सभागृह चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी खा. अशोकजी नेते, माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, माजी न्यायाधिश सुनीलजी दीक्षित, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, शहर अध्यक्ष सोपान नैताम, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, शहर तालुका महामंत्री विनोद गौरकार, तालुका महामंत्री काशिनाथ बुरांडे, तालुका महामंत्री संजय खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पंदिलवार, माजी नगरसेविका रोशनीताई वरघंटे, माजी नगरसेविका कविता किरमे, युमो शहर अध्यक्ष भाविक आभारे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!