– रुग्णांची भेट घेवुन जाणुन घेतल्या समस्या
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी 10 ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट देवुन अनेक रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी डॉक्टराना दूरध्वनीवरून समस्या सांगितल्या व समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे उपस्थित होत्या.







