विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे लाक्षणीय धरणे आंदोलन 29 जुलै व 30 जुलै ला करत आहेत. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे यांनी विनानुदानित शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वाढीव टप्प्याच्या शासन आदिल त्वरित निर्गमित करावा, त्रुटी पूर्तता केलेल्या व अघोषित शाळांना अनुदान मिळावे, 15 मार्च 2024 रोजीच्या संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, जीआरमधील प्रचलित नियमानुसार अनुदानाचा उल्लेख करावा, शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानित शाळांना जुनी पेन्शन सह सर्व लाभ द्यावे आदींचा समावेश आहे.
या आंदोलनाला भेट देतेवेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, धनंजय देवकर, आशिष रोहनकर, अनिकेत विश्रोजवार, पंकज सोमनकर, नागेश मंगरे, तुषार चुधरी व भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.







