Home गडचिरोली यशश्री शिंदेच्‍या हत्येच्‍या निषेधार्थ भाजयुमोतर्फे गडचिरोलीत निषेध आंदोलन

यशश्री शिंदेच्‍या हत्येच्‍या निषेधार्थ भाजयुमोतर्फे गडचिरोलीत निषेध आंदोलन

139

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : यशश्री शिंदे (वय २१ वर्षे) या तरुणीची दाऊद शेख याने अत्‍यंत विकृत आणि निर्घृणपणे हत्‍या केली. या घटनेच्या निषेधार्थ आज, २९ जुलै रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भाजपा युवा मोर्चा गडचिरोलीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेत राजकारण न करता आरोपीला फाशी द्या’ अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच  यशश्री या युवतीला न्‍याय मिळाला पाहिजे’, अशा घोषणाही देण्‍यात आल्‍या.

या आंदोलनात भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा महामंत्री मंगेश रणदिवे, जिल्हा महामंत्री आशिष रोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सहदेकर, चेतन कोलते, अनिकेत विश्रोजवार , साई सिलमवार, सत्यजित सरदार, विरेनद्र श्रीराम बोपचे, हरीश माकडे, अंकुश पवार, पंकज सोमनकर, नागेश मंगरे, तुषार चुधरी यांच्यासह कार्यकर्ते व मोठ्या संख्‍येने युवक उपस्थित होते.

error: Content is protected !!