Home गडचिरोली शहरात पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी मार्गी लावा : डॉ. मिलिंद नरोटे

शहरात पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी मार्गी लावा : डॉ. मिलिंद नरोटे

154

विदर्भ क्रांती न्यूज

गदचिरोली : गेल्या सतत दहा ते बारा दिवसापासून होणारे सततधार पावसामुळे शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले विविध वस्तीमधील पाणी साचून आणि घरात पाणी गेले तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी अडथळा निर्माण झाला आहे. २८ जुलै २०२४ ला डॉ. मिलिंद नरोटे यांनी अयोधनगर, रेवेन्यू कॉलनी, शिक्षक कॉलनी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेथे असे लक्षात आले की अंतर्गत नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने या परिसरात पाणी साचून राहिले आहे.

अयोध्या नगर रेवेन्यू कॉलनी शिक्षक कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. त्या त्वरित या मुद्याकडे लक्ष देऊन तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्याकडे केली आहे.

यावेळी भाजपा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अनिल तिडके, भाजयुमो महामंत्री मंगेश रणदिवे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सहदेवकर, भाजयुमो जिल्हा सचिव सागर हजारे, भाजपा बंगाली आघाडीचे सत्यजित सरदार, आशिष रोहनकर, वीरेंद्र बोपचे, साई चिलम्बर, चेतन कोलते, अंकुश पवार, अनिकेत विश्रोजवार, रितेश केराम, अंकित मटके, संदीप हुके, पियुष पोटावी, मंथन वलपल्लीवार, पंकज सोमणकर, मंगेश मंगरे, तुषार चुधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!