– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची प्रशासनाकडे मागणी
– शासनस्तरावर पाठपुरावा करून नक्कीच मदत मिळवून देण्याचे आमदारांचे नुकसानग्रस्तांना आश्वासन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मागील काही दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे व सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी शेती, घरे, जनावरे, कुटुंब, शेती उपयोगी अवजारे व साहित्य इत्यादी पाण्याखाली आलेली आहे. यामुळे शेतीचे, घरांचे, जनावर व शेती उपयोगी साहित्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्याची आवश्यकता असून संबधित कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावे, अशी सूचना आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी प्रशासनाला केली आहे.
आपण याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या माध्यमातून कळविले आहे. यावेळी उपसरपंच उमाकांत जुनघरे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, राजू भाऊ मोगरे, रमेश आभारे, सुरज वळूले, घनश्याम आभारे, चंदू गेडाम उपस्थित होते.







