Home गडचिरोली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीची अंमलबजावणी लवकर करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीची अंमलबजावणी लवकर करा

100

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची पंचायत समिती चामोर्शी बीडीओंना सूचना

– आमदार डॉ. होळी यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती चामोर्शीच्या कार्यालयात अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात बैठकीचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या नोंदणीची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नसून त्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नोंदणीच्या अंमलबजावणीसाठी तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी म्हटले आहे.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पत्र व सूचनेनुसार पंचायत समिती चामोर्शीच्या कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला बीडीओ यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!