विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार कृष्णा गजबे यांनी काल देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला, जुनी अरततोंडी येथील गाढवी नदीला आलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून आमदार कृष्णा गजबे यांनी तहसीलदार यांना दूरध्वनीद्वारे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. गाढवी नदीने धोक्याची पातळी ओलाडंली असल्याने नदीकाठच्या किन्हाळा, मोहटोला, जुनी अरततोंडी तसेच जवळच्या गावांना याचा फार मोठा फटका बसला आहे.
पूरपाहणी दरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, देसाईगंजचे पोलिस निरीक्षक जगतापजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिरालालजी शेंडे, योगेशजी राऊत, भोपालजी दरवे, घनश्यामजी राऊत तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.







