Home गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

झाडीबोली साहित्य मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

161

– नवीन कार्यकारिणी गठीत

– डॉ. चंद्रकांत लेनगुरे व कमलेश झाडे यांचा मंडळातर्फे सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ३१ व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांच्या हस्ते झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन रिबीन फीत कापून नुकतेच करण्यात आले. झाडीबोली मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर यांनी त्यांची नवीन वास्तू मंडळाला समर्पित केली. याबद्दल डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी त्यांच्याबद्दल मंडळातर्फे कृतज्ञता व्यक्त करतानाच यामुळे आता हे मंडळ अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी अध्यक्ष डॉ. लेनगुरे यांनी मंडळाला ७ वर्षात विविध साहित्यिक उपक्रम राबवून समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सचिव कमलेश झाडे यांचा सुध्दा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या झाडीबोली साहित्य मंडळाच्या वर्धापनदिनी घेतलेल्या सभेत अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, सचिव संजीव बोरकर, उपाध्यक्ष प्रवीण किलनाके, दुसरे उपाध्यक्षा वर्षा पडघन, कोषाध्यक्ष मारोती आरेवार, सहसचिव उपेन्द्र रोहणकर, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र रायपुरे, संघटिका प्रेमिला अलोने, संघटक पुरूषोत्तम ठाकरे, गजानन गेडाम, मिलिंद उमरे, राम वासेकर, ॲड. संजय ठाकरे, वर्षा राजगडे, कमलेश झाडे,bप्रतिक्षा कोडापे व सल्लागार म्हणून डॉ. लेनगुरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या सर्वांना अध्यक्ष विनायक धानोरकर व माजी अध्यक्ष डॉ. लेनगुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. मंडळाच्या उत्कर्षासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन उभयतांनी केले.

याप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळाचे तालुका अध्यक्ष डॉ. देवेंद्र मुनघाटे, खेमदेव हस्ते, मिलींद खोब्रागडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन संजीव बोरकर तर आभार प्रदर्शन प्रेमिला अलोने यांनी केले.

error: Content is protected !!